सचिनचं 51 वं शतक पूर्ण

January 4, 2011 12:10 PM0 commentsViews:

04 जानेवारी

केपटाउन भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडूळकरने न्यूलैंडस मैदानावर खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या टेस्ट मध्ये 2011 च्या नववर्षाच्या सुरूवातीला आपलं 51 शतक पूर्ण केलं. सचिनच्या शानदार खेळामुळे भारत 6 विकेटवर 258 रन्स पूर्ण केली आहे. सचिन कालपासून सहा तासांच्यावर मैदानावर तळ ठोकून आहे. गंभीरबरोबर तिसर्‍या विकेटसाठी 176 रन्सची भागिदारी करत सचिनने भारतीय इनिंगला हा आकार दिला. गंभीर 93 रन्सवर आऊट झाला. पण सचिनने आपली सेंच्युरी पूर्ण केली. 212 बॉल्समध्ये सचिनने आपली सेंच्युरी पूर्ण केली. आणि यात त्याने 12 फोर मारले. भारतीय टीम आता पहिल्या इनिंगमध्ये 110 रन्सनी पिछाडीवर आहे.

close