सोलापूरमध्ये वैवाहिक वादातून पत्नीची गोळ्या घालून हत्या

January 4, 2011 12:44 PM0 commentsViews: 1

04 जानेवारी

सोलापूरमध्ये मध्यरात्री रमेश गाडेकर या बिल्डरने आपल्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे विजापूर रोड परिसरात खळबळ माजली. विजापूर नाका पोलिस स्टेशनसमोरच गाडेकर याचं घर आहे. गाडेकर यांची दोन लग्न झाली. दुसर्‍या पत्नीच्या मुद्यावरुन त्याचं पहिल्या पत्नीशी भांडण झालं. यामुळे चिडून रमेश यांनी आपल्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून पहिल्या पत्नीची हत्या केली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गाडेकरला अटक केली.

close