आरटीआय कार्यकर्ते मानेंनी तक्रार मागे घेतली

January 4, 2011 2:03 PM0 commentsViews: 4

04 जानेवारी

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अरुण माने यांच्यावरील हल्ला प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली. अरुण माने यांनी स्वत: पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेतली आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आपण हा प्रकार स्वता केल्याची कबुली मानेंनी दिल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच सर्व पुरावे मानेंच्या विरोधात असल्याचा दावाही पोलिसांनी केला. पण अरुण मानेंनी आपण भीतीपोटी ही तक्रार मागे घेतल्याचं अरुण मानेंचं म्हणणं आहे.

आरटीआय कार्यकर्ते अरूण माने हे वर्षभरापूर्वी हत्या झालेले आरटीआय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांचे सहकारी आहेत. माने यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते.आपल्याला सतत धमक्या येत असल्याचा माने यांनी दावा केला होता. तसेच पोलीस संरक्षण देण्याचंही मान्य झालं होतं. मात्र रविवारी सकाळी माने आपल्या दूकानावर एकटे असताना अज्ञात मारेकर्‍यांनी हल्ला केला. गेल्या वर्षभरात आरटीआय कार्यकर्त्यांवर तळेगाव दाभाडे इथं झालेला हा तिसरा हल्ला आहे.येत्या 13 जानेवारीला आरटीआय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या मृत्युला एक वर्ष पूर्ण होत आहे.

close