खानापूर पंचायत समितीवर कन्नड भाषिकांची सत्ता

January 4, 2011 2:35 PM0 commentsViews: 10

04 जानेवारी

बेळगाव आणि खानापूर तालुका पंचायत समिती निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला दुहीचा फटका बसला. 56 वर्षांच्या इतिहासात बेळगाव आणि खानापूर पंचायत समितीवर कन्नड भाषिकांची सत्ता आली. बेळगाव पंचायत समितीवर त्रिशंकु परिस्थिती आहे. एकीकरण समितीच्या दोन्ही गटाचे 16 सदस्य निवडूण आले. तर खानापूर पंचायत समितीत महाराष्ट्र एकीकरण समितीची धुळधाण झाली.तीथं भाजपनं मुसंडी मारली. पंचायत समिती निवडणुकांमध्ये एन.डी.पाटील गट आणि माजी आमदार बी.वाय.पाटील गट एकमेकांच्या विरोधात उतरले आणि त्याचा फायदा झाला तो राष्ट्रीय पक्षांना. बेळगाव पंचायत समितीत एन.डी.पाटील गटाला 12 जागा मिळाल्यात तर बी.आय.पाटील गटाला फक्त 4 जागा मिळाल्या आहे. म्हणजे एकीकरण समितीला 40 पैकी 16 जागा मिळाल्या तर गेल्यावेळी 40 पैकी 24 जागा मिळाल्या होत्या. तर खानापूर तालुका पंचायत समितीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडाला. इथं महाराष्ट्र एकीकरण समितीला 24 पैकी फक्त 4 जागा मिळाल्या आहे.

close