‘अंध ‘ जगाला उजेड देणारी संस्था अंधारात

January 4, 2011 2:54 PM0 commentsViews: 3

04 जानेवारी

आज मंगळवारी ब्रेल डे जगभर साजरा होत आहेत. नॅब इं़डिया ही भारतातील ब्रेल प्रेस चालवणारी एकमेव संस्था असूनही गेल्या तीन वर्षापासून नॅब इंडियाला भारत सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे संस्थेला कित्येक वर्ष तोटा सहन करुन अंध विद्यार्थ्यांना पुस्तके वाटावी लागत आहे. 1970 पासून या संस्थेला सरकारकडून अनुदान मिळत होतं. कारण न दाखवताच सरकारने अचानक अनुदान बंद केलं. लोकांच्या डोनेशनच्या बळावर नॅब अनेक वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करते. परंतु सरकारचे योग्य पाठबळ नसल्याने अंध मुलांना हवी तशी मदत करता येत नाही अशी खंत शिक्षकांनी मांडली.

close