पुण्यात बीआरटीचं जाळं निर्माण होणार

January 4, 2011 4:40 PM0 commentsViews: 2

04 जानेवारी

पुणे शहरात आता बीआरटीचं जाळं निर्माण होणार आहे. महापालिकेनं शहरातील 27 रस्त्यांवर बीआरटीचं काम सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 88 कोटी रुपये खर्चून या रस्त्यांचं काम केलं जाणार आहे. सिंहगड रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, आळंदी रस्ता, लोहगाव विमानतळ रस्ता, बाणेर रस्ता, नेहरू रस्ता, शिवाजी रस्ता, बंडगार्डन ते पुणे स्टेशन रस्ता या प्रमुख रस्त्यांचा यात समावेश आहे.

close