नवी मुंबईच्या व्यापार्‍यांना प्रतिक्षा चांगल्या कांद्याची

January 4, 2011 4:52 PM0 commentsViews:

04 जानेवारी

नवी मुंबईच्या ऐपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची समाधानकारक आवक झाली. नेहमी सरासरी 100 गाड्यांची आवक होत असते. पण आज आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव होलसेल बाजारात 5 रूपयांनी कमी झाले. आज होलसेल मार्केटमध्ये 40-45 रुपये किलोनं कांद्याची विक्री झाली आहे.आज एकूण 136 गाड्यांची आवक झाली. आवक वाढून देखील कांद्याचे भाव मात्र खूप कमी झालेले नाहीत. कारण अजूनही बाजारात येणारा कांदा हा खराब आहे. येत्या 15 ते 20 दिवसात चांगल्या प्रतिचा कांदा बाजारात येणार असल्यानं कांद्याचे भाव कमी होतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे.

close