‘सुट्टी’ होण्याअगोदर तिवारी सुट्टीवर !

January 5, 2011 8:42 AM0 commentsViews: 6

05 जानेवारी

आदर्श प्रकरणी रामानंद तिवारी यांचा आडमुठेपणा कायम आहे. राज्य सरकारनं आदेश देऊनही त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. उलट आता तर तिवारी दीर्घ रजेवर गेले. आपल्या रजेचा अर्ज त्यांनी राज्यपालांकडे सादर केला. तिवारींचा अर्ज मिळाल्याची राजभवनाकडून पुष्टी करण्यात आली आहे. मात्र राज्यपालांनी अजून त्यांच्या या अर्जावर काहीही निर्णय घेतलेला नाही.यापूर्वी सुभाष लाला राजीनामा देणार नाही असं म्हणत होते. पण त्यांनी राजीनामा दिलेला आहे.

दरम्यान रामानंद तिवारी यांनी कायद्याचा पूर्ण अभ्यास करुनच रजेचा निर्णय घेतला असेल असं वाय. पी. सिंग यांनी म्हंटलं आहे. तर प्रकरणातली कारवाई टाळण्यासाठी रामानंद तिवारी रजेचं नाटक करीत असल्याचा टीका भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली.

close