लवासात पर्यावरण मंत्रालयाची टीम दाखल

January 5, 2011 9:04 AM0 commentsViews:

05 जानेवारी

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाची टीम सध्या लवासा प्रकल्पाची पाहणी करत आहे. ही टीम लवासा प्रकल्पाची चौकशी करुन तीन दिवसात याचा अहवाल सादर करणार आहे नरेश दयाल यांच्या नेतृत्वाखाली ही टीम पाहणी करत आहे. नलिनी भट आणि भारत भूषण हे या टीमचे सदस्य आहेत. तर केंद्रीय टीमच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या अधिकार्‍यांचीही एक टीम लवासात दाखल झाली. पी. एम. ए. हकीम यांच्या नेतृत्वाखाली ही टीम असून जी.के. देशपांडे आणि शरद चाफेकर हे या टीमचे सदस्य आहेत. लवासाचं बांधकाम 1 हजार मीटरच्यावर आहे का आणि बांधकाम करताना पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन झालं का याची ही टीम पाहणी करणार आहे. लवासाची पाहणी करण्यासाठी आलेल्या टीमसमोर यावेळी लवासाच्या स्थानिक नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी ठिकठिकाणचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. लवासाच्या रखडलेल्या कामांचा त्यांनी निषेध केला.

close