मुंबईत कोट्यावधी किमतीचं रक्तचंदन पकडलं

January 5, 2011 10:08 AM0 commentsViews: 45

05 जानेवारी

मुंबईहून दुबईला पाठवण्यात येणारे 26 मॅट्रीक टन रक्तचंदन कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई इथल्या जेएनपीटी बंदरात ही कारवाई करण्यात आली. वसईतून इक्रा एक्सपोर्ट या कंपनीच्या नावाने बोगस पेपर तयार करून रक्तचंदन दुबईला नेण्यात येत होते. मात्र याबाबत माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाच्या सेंट्रल इंटेलिजेंस यूनिटन कंटेनरची तपासणी केली. त्यात 2 कोटी 9 लाख रूपये किंमतीचं रक्तचंदन आढळलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सव्वा सहा कोटी रुपये आहे. वर्षभरातील तस्करीची ही 16 वी घटना आहे. पनवेल आणि रांजणगाव परिसरात रक्तचंदन तस्करी करणार्‍या 5 ते 6 टोळ्या कार्यरत असल्याचं कस्टम विभागानं म्हंटलं आहे.

close