राणेंविरुद्ध शिवसेनेचा यल्गार ; भ्रष्टाचाराच्या 12 प्रकरणांची माहिती राज्यपालांकडे सादर

January 5, 2011 11:35 AM0 commentsViews: 1

05 जानेवारी

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. उद्योगमंत्री नारायण राणेंच्या भ्रष्टाचारासंबंधी आरोप करत त्यांच्या एकूण 12 प्रकरणांची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे. असे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांगितले. तसेच राज्यपालांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.

close