नाशिकच्या आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या सायकली परत घेतल्या !

January 5, 2011 12:00 PM0 commentsViews: 4

05 जानेवारी

आदिवासी जनहिताय हे ब्रीद मिरवणार्‍या आदिवासी विकास विभागाच्या अफलातून कारभाराचे अनेक नमुने पुढे येताहेत. नाशिक जिल्ह्यातल्या कळवणमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकल खात्यानं परत घेतल्या आहेत. इतकंच नाही, तर त्याविरोधात मोर्चा घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना तब्बल 5 तास उन्हात ताटकळत ठेवण्या आलं. विशेष म्हणजे याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं नाही.

close