शिवसेनेनंतर आता संघही साध्वीच्या पाठीशी

November 2, 2008 8:55 AM0 commentsViews: 2

2 नोव्हेंबर जम्मू -शिवसेनेनंतर आता रा.स्व.संघ ही मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झालेल्या साध्वीच्या पाठीशी उभी राहिली आहे. साध्वीविरुद्ध काहीही पुरावे नसल्याचं मत संघाच्या पदाधिका-यांनी व्यक्त केलंय. साध्वीला मदत करण्याची भूमिका याआधीच शिवसेनेनं घेतली आहे.या भूमिकेबाबत आयबीएन लोकमतशी बोलताना संघाचे राम माधव म्हणाले, हे हिंदू संघटना विरुद्धचं षडयंत्र आहे. तपास अधिकारी वेळोवेळी आपला स्टॅण्ड बदलत आहेत. त्यामुळे एकाप्रकारे लष्करातील अधिकारी , हिंदू संघटना यांना बदनाम करण्यासाठी हे चाललंय असं वाटतं. शिवसेनेनंतर आता आरएसएस साध्वीला मदत करतेय याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ज्याप्रकारे तपास चालू आहे. ते पाहता साध्वीला कायदेशीर मदत करण्याचे आमचे प्रयत्न असतील. आम्हाला पूर्ण विश्वास आहे तपासानंतर सत्य काय ते सर्वासमोर येईलच. या प्रकरणात आम्ही कोणतही आंदोलन करणार नाही. परंतु कायदयानुसार आम्ही सर्व मदत करणार. याप्रकरणी सशंयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या ' अभिनव भारत ' या संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. साध्वीच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सापडत नसून त्यांना यात गोवलं जात आहे, अनेक चाचण्या करून त्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ' हिंदू दहशतवाद ' या शब्दांविषयीही त्यांनी आक्षेप घेतला आहे. वकीलपत्राबाबत त्या नाशिकमध्ये साध्वी प्रज्ञासिंहची भेटही घेणार आहेत.

close