फी वाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांने चालु वर्गात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

January 5, 2011 12:14 PM0 commentsViews: 4

05 जानेवारी

बीड इथल्या कै. अशोक संचेती डी.एड. महाविद्यालयातील विद्यार्थ्यानं फी वाढीच्या निषेधार्थ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रवींद्र आमटे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. डी. एडची फी 12 हजार रुपये आहे. मात्र त्याच्याकडून 8 हजार जास्त घेण्यात येत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे रवींद्र याने भर वर्गात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य त्रास देत असल्याचा आरोप त्याने केला. दरम्यान, रवींद्रवर खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तोडफोड केली. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला.

close