पावसकरांचा सेनेला जय महाराष्ट्र ; राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता

January 5, 2011 12:22 PM0 commentsViews: 3

05 जानेवारी

शिवसेनेला आज आणखी एक धक्का बसला किरण पावसकर यांनी आज शिवसेनेला रामराम ठोकला आहे.थोड्याच वेळापूर्वी किरण पावसकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याअगोदर त्यांनी भारतीय कामगार सेनेचा राजीनामा दिला. पावसकर हे कामगार सेनेचे सरचिटणीस आहेत.पावसरक यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली. पणअजूनही पावसकर यांच्या राजीनाम्याचे कारण समजलेले नाही.दरम्यान किरण पावसकर राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त करण्याता येते. काही वेळापूर्वीच किरण पावसकर यांनी अजित पवारांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. किरण पावसकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्याशी संवाद साधल्याची माहिती आहे.

close