सोमदेव देववर्मनचा पहिल्याच फेरीत पराभव

January 5, 2011 12:33 PM0 commentsViews: 6

05 जानेवारी

एशियन गेम्समधला गोल्ड मेडल विजेता आणि गेल्या वर्षीच्या चेन्नई ओपनचा उपविजेता सोमदेव देववर्मनला यंदाच्या चेन्नई ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. बेल्जीयमच्या डेव्हिड गॉफिनविरूद्ध सोमदेवची मॅच होती. गॉफिनचं वर्ल्ड रँकिंगसुद्धा सोमदेवपेक्षा खुप कमी आहे. पण असं असतानाही गॉफिनने मॅचमध्ये सरस कामगिरी केली. मॅचच्या पहिल्या सेटमध्ये गॉफिनने वर्चस्व ठेवलं. गॉफिनच्या सर्व्हिसवर सोमदेवकडे कुठलंही उत्तर नव्हतं. बघता बघता गॉफिनने पहिला सेट 6-2 असा खिशात घातला. आणि चेन्नईच्या या टेनिस कोर्टवर शांतता पसरली. दुसर्‍या सेटमध्ये सोमदेवने काही अप्रतिम शॉट मारले. गॉफिनची सर्व्हिस ब्रेक करायची तीनदा संधीही त्याला मिळाली. पण या संधीचा त्याला फायदा मात्र उचलता आला नाही. गॉफिनने मात्र सोमदेवची सर्व्हिस मोडली आणि दुसरा सेट 6-4ने जिंकत एक तास आणि 26 मिनिटात मॅच खिशात घातली.

close