चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रात 1840 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प

January 5, 2011 1:40 PM0 commentsViews: 10

05 जानेवारी

चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रात तांत्रिक बिघाड झाला. सातपैकी सहा युनिटस् बिघडली आहेत. यातली दोन युनिटस उद्या(गुरुवारी) सकाळी पूर्ववत होण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे 1840 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये या बिघाडाचा फटका बसू शकतो. पॉवरग्रीडनी हाय फ्रिक्वेन्सीनं वीज खेचल्यामुळे हा बिघाड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन आणि चार नंबरचं युनिट सकाळपर्यत सुरु होईल अशी शक्यता आहे.

close