मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याप्रकरणी आमदार जाधव यांना अटक

January 5, 2011 1:59 PM0 commentsViews: 4

04 जानेवारी

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्याचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना मारहाण केली. तर प्रत्युत्तरादाखल जाधव यांनीही पोलिसांना मारहाण केली. खुल्ताबाद-वेरुळ दरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान जाधव यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकारनं मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांवर अन्याय केल्याचा आरोप जाधव यांनी केला. हर्षवर्धन जाधव हे मनसेचे आमदार आहेत. आमदार जाधव यांना भेटण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला.

close