सुरेश कलमाडींची सीबीआयनं केली तब्बल नऊ तास झाडाझडती

January 5, 2011 5:10 PM0 commentsViews: 1

05 जानेवारी

अखेर कलमाडी यांची सीबीआयनं आज चौकशी केली. सकाळी नऊ वाजता कलमाडी सीबीआयच्या दिल्लीतल्या मुख्यालयात दाखल झाले. ही चौकशी संध्याकाळी 7 वाजता संपली. चौकशी संपल्यानंतर कलमाडी हसत-हसत सीबीआयच्या हेडक्वार्टरमधून बाहेर पडले. कलमाडी यांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची सीबीआयची इच्छा होती. पण आपल्याला तीन दिवसांचा वेळ द्यावा अशी विनंती कलमाडींनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 24 डिसेंबरला कलमाडी यांच्या दिल्लीतल्या घरात सापडलेली कागदपत्र यावेळी सीबीआयकडे होती. कलमाडींना तब्बल तीन महिन्यानंतर सीबीआयनं चौकशीसाठी बोलावलं होतं. एक महिन्यापू्र्‌वी सीबीआयनं कॉमनवेल्थमधल्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित तीन गुन्हे दाखल केले होते.

तीन महिन्यानंतर सीबीआयनं कलमाडींना पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावलं. कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान चढ्‌या दरानं कंत्राटं दिल्याचा आरोप कलमाडींवर आहे. त्यांच्या दिल्ली, मुंबई आणि पुण्यातल्या घरांवर सीबीआयनं काही दिवसांपूर्वी छापेही टाकले होते. सुरेश कलमाडींची कॉमनवेल्थ गेम्समधल्या तीन घोटाळ्यांप्रकरणी चौकशी झाली. सुमारे आठ तास कलमाडींची चौकशी करण्यात आली. कलमाडींना 102 प्रश्न विचारण्यात आलेत.

कलमाडींची सीबीआय चौकशी

- 668 कोटींचं ओव्हरले कॉन्ट्रॅक्ट देताना उशीर का झाला? – लंडनमध्ये क्विन्स बॅटन रिलेतला आर्थिक गैरव्यवहार – जेलमध्ये असलेल्या टी. एस. दरबारी, संजय महिंद्रू यांच्याशी संबंध कशा प्रकारचे?- ठरलेल्या किंमतीपेक्षा दुप्पट भावानं टाईम स्कोअरिंग मशीनचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं?- कलमाडींचे एक सहकारी संजय भुरे यांची कॉमनवेल्थ मध्ये भूमिका काय?

close