मुंबईतील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची होणार दुरुस्ती !

January 5, 2011 5:27 PM0 commentsViews: 3

05 जानेवारी

गेटवे ऑफ इंडिया इथं असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या दुरवस्थेबाबतची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. त्याची दखल घेत मुंबई महापालिकेत या पुतळ्याच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणाच्या कामासाठी साडेआठ लाख रुपयांचा निधी आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पुढच्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याबाबत आयबीएन लोकमतच्या ग्रेटभेट या कार्यक्रमात याच पुतळ्याचे शिल्पकार सदाशिव साठे यांनी पुतळ्याच्या दुरवस्थेकडं महापालिका कशी दुर्लक्ष करतेय हे स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. त्यानंतर आयबीएन लोकमतनं ही प्रत्यक्ष परिस्थिती जनतेसमोर मांडली, त्यानंतर महापौर श्रद्धा जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी केली होती. आणि आज स्थायी समितीच्या बैठकीत या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला.

close