अनिल कुंबळेनं आता रिटायर्ड व्हावं-दिलीप वेंगसरकर

November 2, 2008 9:11 AM0 commentsViews: 3

02 नोव्हेंबर,क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी अनिल कुंबळेवर जोरदार टीका केलीय.कुंबळेचं करियर संपल्यात जमा असल्याचं त्यांनी म्हटलंय. वेंगसरकर म्हणतात, गेल्या सात टेस्टमध्ये कुंबळे फ्लॉप ठरलाय. गेली 18 वर्षे त्यानं भारतीय क्रिकेटला मोलाचं योगदान दिलंय. हे खरं असलं तरी गेल्या काही मॅचमध्ये मात्र तो निष्प्रभ ठरलाय. त्याच्या रिटायर्डमेंटची वेळ आता जवळ आलीय. नागपूर टेस्टनंतर त्याला पुन्हा कॅप्टन करण्याची शक्यता मला तरी कमी वाटतेय.

close