अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर

January 5, 2011 5:36 PM0 commentsViews: 6

04 जानेवारी

अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार नुकताच जाहीर झाले आहे.या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांना समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तर साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक संपादक डॉ. अरूण टिकेकरांना जाहीर झाला आहे. तर समाजकार्य पुरस्कार विभागामध्ये समाजप्रबोधन पुरस्कार सत्यपाल महाराज तर सामाजिक प्रश्न पुरस्कार हरीष सदानी यांना जाहीर झाला. तसेच स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. दोन लाख रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.

close