भारतासमोर 340 धावांचं आव्हान

January 5, 2011 5:44 PM0 commentsViews: 4

05 जानेवारी

केपटाऊन टेस्टमध्ये जॅक कॅलिसच्या झुंजार बॅटिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी भारतासमोर 340 रन्सचं आव्हान ठेवलं. दक्षिण आफ्रिकेची दुसरी इनिंग 341 रन्सवर ऑलआऊट झाली. दुखापतीवर मात करत कॅलिसनं केपटाऊन टेस्टच्या सलग दुसर्‍या इनिंगमध्ये सेंच्युरी ठोकली. टेस्ट करियरमधली कॅलिसची ही 40 वी सेंच्युरी ठरली. भारतीय बॉलर्सनं आफ्रिकेची टॉप ऑर्डर झटपट गुंडाळली पण तळाच्या बॅट्समनना आऊट करण्यात मात्र त्यांना अपयश आलं. कॅलिस आणि मार्क बाऊचरनं सातव्या विकेटसाठी 103 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरली. बाऊचर 55 रन्सवर आऊट झाला. भारतातर्फे हरभजन सिंगनं 7 विकेट घेतल्या.

close