दोन दिवसात चौकशी सुरु होणार – मुख्यमंत्री

January 5, 2011 6:12 PM0 commentsViews: 2

05 जानेवारी

आदर्श सोसायटी प्रकरणी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यानी लवकरचं आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात येईल असं सुतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. दरम्यान आदर्शची न्यायालयीन चौकशी दोन दिवसांत सुरू करणार अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज औरंगाबादमध्ये दिली. तसेच रामानंद तिवारींबाबत काय करायचे हे आत्ताच सांगता येणार नाही. कारवाई होईल, पण थांबा त्यांची कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान आदर्श घोटाळ्यात अडकलेले रामानंद तिवारी काही केल्या राजीनामा द्यायला तयार नाहीत. राजीनामा देण्याची राज्य सरकारची सूचना त्यांनी धुडकावून लावली. राज्य सरकार त्यांच्या निलंबनासाठी राज्यपालांकडे शिफारस करण्याच्या तयारीत असतानाच तिवारींनी राज्यपालांकडे 3 महिन्यांच्या रजेसाठी अर्ज केला. पण हा अर्ज आता फेटाळण्यात आला.

close