स्वतंत्र तेलंगणाला 6 पर्याय

January 6, 2011 9:38 AM0 commentsViews: 1

06 जानेवारी

स्वतंत्र तेलंगणाबाबतचा श्रीकृष्ण अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. यामध्ये संयुक्त आंध्रपदेशची शिफारस करण्यात करण्यात आली आहे. तर स्वतंत्र तेलंगणाला विरोध करण्यात आला आहे. मात्र या वादग्रस्त मुद्याच्या तोडग्यासाठी सहा पर्याय सुचवण्यात आले आहेत. त्यामध्ये सगळ्यांत महत्वाचा म्हणजे विकासासाठी मुख्यमंत्री किवा उपमुख्यमंत्री तेलंगणाचा असावा हा पर्याय सुचवण्यात आला. सध्यातरी या अहवालात स्वतंत्र तेलंगणाची शिफारस करण्यात आलेली नाही. तेलंगणा स्वतंत्र राज्य झाल्यास आर्थिक असमतोल निर्माण होईल असंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. हा अहवालाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात कडक सुरक्षाव्यवस्था लावण्यात आली. आंध्र प्रदेशातील नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन सर्वपक्षांनी केलं. दरम्यान आयोगानं दिलेल्या सहा पर्यायातून योग्य पर्याय लवकरच निवडला जाईल असं पी. चिदंबरम यांनी सांगितलं.

अहवालात 6 महत्वाचे पर्याय

1) परिस्थिती जैसे थे, संयुक्त आंध्रप्रदेश किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री तेलंगणाला2) राज्याची सीमांध्र आणि तेलंगणात विभागणी, हैद्राबाद केंद्रशासित प्रदेश3) राज्याची सीमंाध्र आणि तेलंगणात विभागणी, दोन्हींची स्वतंत्र राजधानी, हैद्राबाद केंद्रशासित प्रदेश4) राज्याची राय तेलंगणा आणि कोस्टल आंध्र अशी विभागणी, हैद्राबाद राय तेलंगणासोबत5) राज्याची सीमांध्र आणि तेलंगणात विभागणी , हैद्राबाद तेलंगणासोबत6) संयुक्त आंध्र प्रदेश, तेलंगणासाठी स्वतंत्र परिषद

close