आमदार जाधव यांना मारहाण प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा- नांदगावकर

January 6, 2011 9:55 AM0 commentsViews: 1

06 जानेवारी

मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली. औरंगाबादमध्ये आज (गुरुवारी) नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांची तक्रार केली. आमदार जाधव यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान नांदगावकर यांनी जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. पोलिसांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नांदगावकर यांनी दिला.

close