औरंगाबादचं नाव बदलणार नाही – मुख्यमंत्री

January 6, 2011 10:26 AM0 commentsViews: 2

06 जानेवारी

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. 2001मध्ये याबाबतचा प्रस्ताव आघाडी सरकारनं विखंडीत केला होता त्याचा पुनर्विचार केला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारणसभेत औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा आणि चिकलठाणा विमातनळाला राजे संभाजी भोसले असे नाव देण्याचा प्रस्ताव माडंण्यात आला. सभेला सुरूवात होताच विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध दर्शविला होता.या गोंधळातचं दोन्ही ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला.

close