पाणीपट्टी विरोधात सोलापूर महापालिकेवर भव्य मोर्चा

January 6, 2011 11:55 AM0 commentsViews: 4

06 जानेवारी

सोलापूर महापालिकेनं पाणीपट्टीत 40 टक्के वाढ केली. या निर्णयाविरोधात डाव्या लोकशाही आघाडीनं काल बुधवारी महापालिकेवर भव्य मोर्चा काढला. राज्य सरकारनं महापालिकेला शहर विकासासाठी 145 कोटी रुपये दिले आहेत. यातील 50 टक्के रक्कम सॉफ्ट लोन म्हणून देण्यात आली. पण आता कर्ज परत करण्यासाठी नागरिकांवर भुर्दंड लादण्यात येत असल्याचा आरोप डाव्या लोकशाही आघाडीनं केला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.

close