पावसकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश ही सुरूवात आहे – आर.आर. पाटील

January 6, 2011 1:10 PM0 commentsViews: 5

06 जानेवारी

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आज गुरुवारी किरण पावसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.अजित पवार,आर.आर.पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत किरण पावसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. किरण पावसकर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. तसेच मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल असं ही आर.आर.पाटलांनी सांगितलं. तर शिवसेनेत होणार्‍या अपमानांमुळे शिवसेना सोडल्याचं किरण पावसकर यांनी स्पष्ट केलं.तसेच आपण एकट आलो नाहीत आपल्याबरोबर आणखी काही कामगार नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा खुलासा पावसकरांनी केला. दरम्यान पावसकरांचा प्रवेश फक्त सुरूवात आहे येत्या काळात आणखी काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट आर.आर.पाटील यांनी यावेळी केला.

close