भारत-आफ्रिका कसोटी अनिर्णित

January 6, 2011 4:27 PM0 commentsViews: 2

06 जानेवारी

केपटाऊन टेस्ट अपेक्षेप्रमाणेच ड्रॉ झाली. दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी भारतासमोर 340 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारतानं 3 विकेट गमावत 166 रन्स केले. केपटाऊन टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतानं बॅटिंगला सुरुवात केली. पण ओपनिंगला आलेला विरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. यानंतर गौतम गंभीर आणि राहुल द्रविडने दुसर्‍या विकेटसाठी 79 रन्सची पार्टनरशिप करत भारताची इनिंग सावरली. द्रविड 31 रन्सवर आऊट झाला. गौतम गंभीरनं मात्र आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. गंभीर आऊट झाल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि व्ही व्ही एस लक्ष्मणनं उरलेला वेळ खेळून काढला. तेंडुलकर 14 रन्सवर तर लक्ष्मण 32 रन्सवर नॉटआऊट राहिले. केपटाऊन टेस्ट ड्रॉ झाल्याने तीन टेस्ट मॅचची ही सीरिजही 1-1 अशी बरोरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेत भारतानं पहिल्यांदाच टेस्ट सीरिज ड्रॉ करण्यात यश मिळवलं.

close