अशोक चव्हाणांच्या सहकार्यांनी दिली 70 कोटींची ऑफर – विनोद तावडे

January 6, 2011 4:38 PM0 commentsViews: 4

06 जानेवारी

आदर्श घोटाळ्यानंतर अशोक चव्हाण यांनी आणखी एक घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी केला होता. आता या भ्रष्टाचाराबाबत बोलू नये यासाठी अशोक चव्हाण यांच्या दोन निकटवर्तीय मंत्री आणि बिल्डर्सनं आपल्याला 70 कोटी रुपयांचं आमिष दाखवल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला. धुळ्यात अजब सरकारचे गजब घोटाळे या व्याख्यानमालेत बोलत असताना विनोद तावडे यांनी हा गौप्यस्फोट केला. मुंबई शहराच्या मध्यभागी वसलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स मधल्या गव्हर्नमेंट कॉलनीच्या बाजूच्या भूखंडावर रेणुका सोसायटी उभारण्यात आली. या सोसायटीची जागा न्यायालयीन कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडातून तोडून घेण्यात आली आहे. असा आरोप भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी केला.

close