23 नोव्हेंबरला होणा-या रेल्वे परीक्षेचं केंद्र महाराष्ट्रात नाही

November 2, 2008 9:36 AM0 commentsViews: 2

02 नोव्हेंबर,रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी परप्रातीयांवर हल्ले झाल्यास महाराष्ट्रात रेल्वे परीक्षा घेणार नसल्याचं सांगितलं होतं. लालूंची ही धमकी रेल्वे भर्ती बोर्डानं अक्षरश: खरी करून दाखवली. रेल्वेच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या उमेदवारांना राज्याबाहेरची परीक्षा केंद्रे मिळाली आहेत. मुंबई केंद्र निवडलेल्या अनेक उमेदवारांना लखनौ केंद्राचं प्रवेशपत्र मिळालंय. महाराष्ट्र वगळता ही परीक्षा इतर राज्यांतल्या केंद्रावर होणार आहे. मुंबईत उत्तरभारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर लालूंनी महाराष्ट्रात परीक्षा घेणार नाही असं सांगितलं होतं. ही धमकी लालूंनी खरी करून दाखवल्याचं आता दिसतं आहे.

close