कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चौथा एफआयआर दाखल

January 6, 2011 5:11 PM0 commentsViews: 1

06 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चौथा एफआयआर दाखल केला.ओव्हरले कॉन्ट्रॅक्टशी संबंधित एफआयआर आहे. त्यात आयोजन समितीचे महासंचालक आणि कलमाडींचे जवळचे सहकारी व्ही. के. वर्मा यांच नाव त्यात आहे. तसेच परदेशातल्या चार कंपन्यांच्या अधिकार्‍यांची नावंही त्यात आहेत. दरम्यान सीबीआयनं दिल्लीत आज सकाळपासून दहा वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑफिसेसमध्ये छापे मारले. नॅशनल स्पोर्ट्स डिव्हिजनच्या होस्टेलवरही सीबीआयनं छापा मारला. स्पोर्ट्स डिव्हिजन केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारित येतं.

close