कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता

January 6, 2011 5:31 PM0 commentsViews: 1

06 जानेवारी

कांदा पुन्हा एकदा महागण्याची शक्यता आहे. पाकिस्ताननं जमिनीच्या मार्गानं भारताला कांदा पाठवायला बंदी घातली आहे. त्यामुळे भारतात येण्यासाठी निघालेले 200 कांद्याचे ट्रक वाघा बॉर्डरवर अडकून पडले आहे. पाकिस्ताननं अचानक घातलेल्या बंदीमुळे दोन्ही देशांतल्या व्यापार्‍यांनाही फटका बसणार आहे. भारतानं पाकिस्तानातल्या व्यापार्‍यांना 1500 टन कांदा आयातीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. पण पाकिस्ताननं हा कांदा पुरवायला परवानगी नाकारली असा दावा आयातदारांनी केला. यापूर्वी पाकिस्तानातून कांदा आल्यामुळे भारतातल्या काही भागात कांद्याचे दर खाली आले होते. पण पाकिस्तानच्या निर्णयाचा आता मोठा फटका बसेल असं वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी म्हटलं.

close