कॉलींगवुडचा टेस्ट क्रिकेटला अलविदा

January 6, 2011 6:30 PM0 commentsViews: 1

06 जानेवारी

इंग्लंडचा क्रिकेटर पॉल कॉलींगवुडनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऍशेस सीरिजमध्ये कॉलींगवुडला फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. सध्या सुरु असलेल्या पाचव्या आणि फायनल सिडनी टेस्टमध्येही त्याला फक्त 13 रन्स करता आले. या सीरिजमध्ये 6 इनिंगमध्ये त्यानं 13 च्या ऍव्हरेजने फक्त 83 रन्स केले आहे. त्यामुळे या टेस्ट मॅचनंतर निवृत्त होण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. सध्या इंग्लंड टीमकडुन मिडल ऑर्डरमध्ये खेळणार्‍या कॉल्ंागिवुडने टी-20 आणि वन डे मध्ये मात्र खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडनं 2010 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

close