केपटाऊन टेस्टमध्ये भारतीय टीमला दंड

January 6, 2011 6:33 PM0 commentsViews: 1

06 जानेवारी

केपटाऊन टेस्टमध्ये ओव्हर्सची गती न राखल्यामुळे भारतीय टीमला दंड झाला. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय टीमने तीन ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी ही कारवाई केली. कॅप्टन धोणीच्या मॅच फीमधून साठ टक्के तर इतर खेळाडूंच्या मॅच फीमधून तीस टक्के कापण्यात येणार आहे. या हंगामात भारतीय टीमला दुसर्‍यांदा असा दंड झाला. येत्या वर्षाभरात भारतीय टीमने पुन्हा ही चूक केली तर आयसीसीच्या नियमांनुसार धोणीवर एका मॅचची बंदी लादली जाऊ शकते.

close