तत्काळ चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

January 7, 2011 9:33 AM0 commentsViews: 97

07 जानेवारी

औरंगाबाद येथील कन्नड तालुक्याचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचं प्रकरण चांगलंच पेटलं आहे. त्यामुळे एखाद्या अट्टल गुन्हेगाराला थर्ड डिग्रीचा वापर करणार्‍या पोलिसांची चौकशीच करण्याचे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिले आहेत. औरंगाबाद विभागाचे आय.जी.प्रभात रंजन यांना हे आदेश देण्यात आले. तसेच पोलिस महासंचालक शिवानंदन यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार बाळा नांदगावकर यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आमदार जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मारहाण केली असं आधी सांगितलं जात होतं. मात्र, कन्नड तालुक्यातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा चव्हाट्यावर आणल्यामुळे पोलिसांनी जाणीवपूर्वक अमानुष मारहाण केल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला. कविवर्य ना. धों. महानोर यांनीही या मारहाणीचा निषेध केला. तसेच या प्रकरणाचा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनीही निषेध केला.

close