कांदा व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्सचे छापे

January 7, 2011 9:51 AM0 commentsViews: 3

07 जानेवारी

देशभरातल्या कांदा व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्सनं छापे घातले आहेत. महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव इथंही छापे घालण्यात आले आहेत. कांद्याचे भाव वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली. जादा साठा करणार्‍यांवरची कारवाई सरकारनं आता जलदगतीनं करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान देशभरातही कांद्या व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्स विभागानं छापे टाकले आहेत. कानपूर, लखनऊ, कोलकता इथं इन्कमटॅक्सनं छापे घालून कारवाई केली.

दरम्यान भारताला करण्यात येणारी कांद्याची निर्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांनी ही माहिती दिली. हा कांदा रेल्वे आणि समुद्रमार्गाने निर्यात करण्यात येईल. भारताला करण्यात येत असलेली कांद्याची निर्यात थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी घेतला होता.

close