लवासात चुका झाल्या असतील तर दुरुस्त करु – अजित गुलाबचंद

January 7, 2011 10:08 AM0 commentsViews: 2

07 जानेवारी

लवासा प्रकल्पाची तीन दिवसांपासून केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याची टीम पाहणी करत आहे. आज शुक्रवारी हिंदूस्थान कन्सट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी लवासा सिटीत पत्रकार परिषद घेतली. लवासामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करू मात्र लवासासारखे प्रकल्प आवश्यक आहे असं मत एचसीसी चे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी मांडलं.एवढ्या मोठ्या प्रकल्पात काही चुका होऊ शकतात. मात्र पर्यावरणाचं उल्लंघन झालेलं नाही असंही गुलाबचंद यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकल्पाचा सर्व बाजूंनी अभ्यास केला. लवकरात लवकर अहवाल देऊ असं केंद्रीय पर्यावरण पथकाचे प्रमुख नरेश दयाल यांनी सांगितलं. केंद्रीय पर्यावरण समिती आज नवी दिल्लीला रवाना झाली.

close