दिल्ली टेस्टनंतर अनिल कुंबळेची टेस्टमधून निवृत्ती

November 2, 2008 10:24 AM0 commentsViews: 4

2 नोव्हेंबर, दिल्ली भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन अनिल कुंबळे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. दिल्ली टेस्टच्या शेवटच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कुंबळे निवृत्तीची अधिकृत घोषणा करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या शेवटच्या म्हणजेच नागपूर टेस्टसाठी त्यानं महेंद्रसिंग धोणीचं नाव कॅप्टन म्हणून सुचवलंय. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कुंबळेनं 3 विकेट घेतले होते. याआधीच कुंबळेनं वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यांनं 132 कसोटीत 619 विकेट घेतल्या आहेत.

close