चंद्रपूर जिल्ह्यात खोदकामात सापडल्या अनेक पुरातन वस्तू

January 7, 2011 10:58 AM0 commentsViews: 14

07 जानेवारी

गोंड संस्कृतीचं दर्शन घडवणारा चंद्रपूर जिल्हयात बर्‍याच ठिकाणी खोदकाम करताना पुरातन वस्तू आढळल्या आहेत. हिरापूर भागात खोदकाम करत असताना याचा प्रत्यय आल्यानंतर इथं अनेक तज्ज्ञांनी खोदकामाला सुरूवात केली. त्यावेळी सापडलेल्या अवशेषांमधून 2 हजार वर्षापूर्वीच्या काळाचे अंदाज बांधणं शक्य झालं. या खोदकामात मानवी हाडं, तांब्याची नाणी, विटा, दगडी खोल्या आणि शवगृहांचे अवशेष मिळाले.यात पुण्याच्या डेक्कन काँलेजची रिसर्च टिम काम करत आहेत. 2 हजार वर्षापूर्वीचं मानवी राहणीमान, आणि इतर वस्तू या उत्खननामुळे समोर आल्या आहे.

close