शिक्षिका सुजाता चंद्रावळे यांना मिळाली हक्काची जागा

January 7, 2011 11:32 AM0 commentsViews: 4

07 जानेवारी

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील गंगापूरच्या हनुमान विद्यालयातील सुजाता चंद्रावळे या वाळीत टाकलेल्या शिक्षिकेची आता बैठक व्यवस्था पुर्ववत करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून संस्थेनं वाळीत टाक ल होतं. आणि त्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी याबाबतची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेत ग्रामस्थ आणि संचालकांची बैठक झाली. आणि सुजाता यांना एका लेखी पत्र दिलं. या पत्रात त्यांची व्यवस्था महिला शिक्षकांमध्ये केल्याचं नमूद करण्यात आलं.

close