फी वाढीसंदर्भात खासगी शाळेला हायकोर्टाचा दणका

January 7, 2011 11:46 AM0 commentsViews: 7

07 जानेवारी

फी वाढीसंदर्भात खासगी शाळांनी चालवलेल्या मनमानीला हायकोर्टाचा दणका मिळाला. एका याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने कफ परेडच्या बी.डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कुलला पालकांचे 5 लाख 95 हजार रूपये व्याजासकट परत करण्याचे आदेश दिले आहेत. या शाळेत आपल्या पाल्याचा घेतलेला प्रवेश निलेश मेहता आणि सुनिल सक्सेरिया यांना रद्द करायचा होता. पण त्यांनी भरलेली फी परत करण्यास शाळेनं नकार दिला. त्यामुळे नाइलाजानं हायकोर्टात याचिका दाखल केली. यासाठी त्यांनी एका खाजगी संस्थेचीही मदत घेतली. हायकोर्टाच्या निर्णयाचं सर्वच पालकांनी स्वागत केलं.

कफ परेड येथील बि. डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कुलमध्ये प्रवेश घेतलेल्या पालकांना हा प्रवेश रद्द करायचा होता. परंतु शाऴेनी 3 लाखाहुन अधिक रुपये परत देण्यास नकार दिला. वारंवार शाऴा व्यवस्थापनाला विनंती करुनही शाऴा व्यवस्थापनाला हे पैसे परत करायला तयार नव्हती. त्यामुऴे अखेर नाइलाजाने हायकोर्टात याचिका दाखल केली. यासाठी खासगी संस्थेची मदतघेतली. या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने बि. डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कुलला 5.95 लाख रुपये व्याजासहित पालकांना परत करण्याचे आदेश दिले. निशेश मेहता यांची मुलगी अक्षता आणि सुनील सक्सेरिया अशी या दोन्ही पालकांची नावं आहेत.

close