लवासामुळे जंगलाची हानी नाही !

January 7, 2011 12:13 PM0 commentsViews: 12

07 जानेवारी

लवासा प्रकल्पामुळे प्रथमदर्शनी जंगलाची हानी झाल्याचं दिसत नाही असं लवासाची पाहणी करणार्‍या केंद्रीय वन आणि पर्यावरण समितीनं म्हटलं आहे. लवासाचा परिणाम पुण्याच्या पाण्यावर होणार नाही असा दावाही समितीनं केला. पर्यावरण मंत्रालयाच्या समितीचे अध्यक्ष नरेश दयाल यांनी ही माहिती दिली. समितीनं लवासाची तीन दिवस पाहणी केली. त्यानंतर आज त्यांनी हे विधान केलं.

लवासा प्रकल्पाची तीन दिवसांपासून केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याची टीमनं पाहणी केली. तसेच आज लवासा प्रकल्पाबाबत हिंदूस्थान कन्सट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी लवासा सिटीत पत्रकार परिषद ही घेतली होती. लवासामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करू मात्र लवासासारखे प्रकल्प आवश्यक आहे असं मत एचसीसीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी मांडलं होतं. दरम्यान या प्रकल्पाचा सर्व बाजूंनी अभ्यास केला. लवकरात लवकर अहवाल देऊ असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण पथकाचे प्रमुख नरेश दयाल यांनी दिलं आहे. केंद्रीय पर्यावरण समिती आज नवी दिल्लीला रवाना झाली.

close