वोखार्ट हॉस्पीटलमध्ये तरूणाचा मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप

January 7, 2011 1:33 PM0 commentsViews: 2

विनय म्हात्रे, नवी मुंबई

07 जानेवारी

नवीमुंबईतील वोखार्ट हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना संजय खांडे या तरूणाचा मृत्यू झाला आहे. पण ऑपरेशन करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणा संजयचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यातच वोखार्टला गेल्या आठ महिन्यांपासून परवानगीच नसल्याचं उघड झालं आहे.

नवी मुंबईचं वोखार्ट हॉस्पिटल सध्या वादात अडकलं आहे. 9 डिसेंबरला संजय खांडे याचा वाशी इथं अपघात झाला होता. या अपघातानंतर ऑपरेशन करण्यासाठीमहानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधून त्यांना वोखार्टमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला पोलिसांनीही आता या घटनेचा तपास सुरू केला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंटना बांधकामासाठीचे अशुद्ध पाणी दिलं जात असल्याने महापालिकेनेहॉस्पिटलची मान्यताच रद्द केल्याचंही उघड झालं आहे. एकंदरीतच संजय खांडे यांचा मृत्यू आणि हॉस्पिटलने केलेली बेकायदा काम यामुळे हे हॉस्पिटल वादात अडकलं आहे. पण पेशंटच्या जीवाशी खेळणार्‍यांवर महापालिका कधी प्रत्यक्ष कारवाई करणार असा सवाल आता नागरिक विचारत आहे.

close