पेडन्यूज प्रकरणी मंत्रीगट स्थापन

January 7, 2011 1:54 PM0 commentsViews: 4

07 जानेवारी

पेडन्यूज प्रकरणाची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. हे प्रकरण तपासण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी सरकारनं एका मंत्रीगटाची स्थापना केली आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. गृहमंत्री पी. चिदंबरम, कायदामंत्री वीरप्पा मोइली, कृषिमंत्री शरद पवार, नगरविकास मंत्री जयपाल रेड्डी आणि दूसंचार मंत्री कपील सिब्बल यांचा या समितीत समावेश आहे. पेडन्यूज सारख्या प्रकरणांत संबंधित मीडियावर मोठा दंड आकारणं तसेच प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाला ज्यादा अधिकार देणं हे मुद्दे सरकारच्या विचाराधीन आहेत. हा मंत्रीगट त्यासाठीचे धोरण आणि उपाय सुचवेल अशी माहिती सुत्रांनी दिली.

close