पत्रकार दिनानिमित्त दीप्ती राऊत, विनय म्हात्रे आणि प्रताप नाईक यांना पुरस्कार

January 7, 2011 3:09 PM0 commentsViews: 9

07 जानेवारी

पत्रकार दिनानिमित्त म्हणजेच 06 जानेवारीला उत्कृष्ट पत्रकारितेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातील अनेक पत्रकारांना गौरवण्यात आलं. यामध्ये पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करणार्‍या आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर्स आणि व्हिडिओ जर्नलिस्टना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं. आयबीएन-लोकमतचे रिपोर्टर विनय म्हात्रे यांना नवी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा 'जर्नलिस्ट ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात आला. तर आयबीएन लोकमतच्या नाशिकच्या ब्युरो चीफ दीप्ती राऊत यांना मंुबई पत्रकार संघातर्फे ग्रामिण पत्रकारिता पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मंुबईच्या महापौर श्रद्धा जाधव आणि प्रभातचे संपादक अरुण खोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बदलत्या काळात पत्रकारांनी आपली विश्वासार्हता अधिक गंभीरतेनं घ्यावी असं मत अरूण खोरे यांनी व्यक्त केलं. तसंच कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार आमचे कोल्हापूरचे रिपोर्टर प्रताप नाईक यांना देण्यात आला तर उत्कृष्ट कॅमेरामनचा पुरस्कार व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत आयरेकर यांना देण्यात आला. पोलिस महानिरीक्षक भगवंतराव मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

close