थंडीपासून लोकांची सुप्रीम कोर्टाकडुन सोय मात्र सरकाराची उदासीनता

January 7, 2011 3:17 PM0 commentsViews: 4

07 जानेवारी

दर 1 लाख लोकसंख्येमागे थंडीसाठी निवार्‍याची सोय असावी असं सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही महाराष्ट्रात त्याचं पालन होत नसल्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. मुंबईतील एका एनजीओनं ही याचिका केली आहे. शिवाय तत्कालीन मुख्य सचिव जे.पी.डांगे यांनी असे निवारे उभारण्यास इन्कार केल्याचा दावासुद्धा याचिकाकर्त्यांनं केला. तसेच बेघर असलेले अनेकजण हे राज्याबाहेरचे असल्याने त्यांना निवारा देण्याची गरज नाही असंही राज्य सरकारने सांगितल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनं केला. यावर डांगे आणि राज्य सरकारची अशी भूमिका असेल तर त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न कोर्टानं विचारला. तसेच राज्य सरकार आणि जे.पी.डांगे यांना कोर्टात आपली बाजू मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले.

close