दरीत कोसळणार्‍या बसमधून 27 प्रवाशांचे 18 तरूणांनी वाचवले प्राण

January 7, 2011 4:19 PM0 commentsViews: 1

07 जानेवारी

खेडहून पुण्याला जाणार्‍या एस टी महामंडळाच्या बसला रात्री 12.30 वाजता अपघात झाला. ही बस वरंध घाटाजवळ असताना कठड्याला आदळली. ही बस हेलकावे खात होती. पण संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले ते 18 तरुण. शिर्डीहून रायगडमधल्या गोरेगावला जाणार्‍या या तरुणांनी बसमधल्या सर्व प्रवाशांना वाचवलं.बसमधील सर्व प्रवाश्यांनी संकटकाळी उपलब्ध असलेल्या खिडकीतूनबाहेर काढण्यात आलं. त्यावेळी बसमध्ये 27 प्रवासी होते. प्रवासी बाहेर पडल्यानंतर बस दरीत कोसळली. पण या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

close