पंतप्रधानांच्या हस्ते अणुकचरा पुन:प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन

January 7, 2011 4:30 PM0 commentsViews: 5

07 जानेवारी

तारापुर अणूवीज निर्मिती केंद्रात आण्विक कचर्‍यावर पुन:प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाचं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आलं. सध्या गाजत असलेल्या जैतापूर अणुवीज प्रकल्पाच्या विरोधकांनी आण्विक कचरा हा प्रमुख मुद्दा केला. त्या पार्श्वभूमीवर आण्विक कचर्‍यावर पुन:प्रक्रिया करुन तो पुन्हा उपयोगात आणणारा प्रकल्प तारापूरला सुरू करण्यात आला. आण्विक कचर्‍यावर पुन:प्रक्रिया केल्यानंतर औषधं तसेच इतर समाज उपयोगी गोष्टी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. या आधी भारतात चेन्नई इथल्या कल्पकम तसेच मुंबईतल्या भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

close